Natal Nibandh In Marathi:- नमस्कार मित्रांनो आज आपण “नाताळ या विषयावर निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
नाताळ निबंध मराठी | Natal Nibandh In Marathi
आपल्या भारत देशात अनेक सण मोठ्या आनंदात साजरे केले जातात. आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात व सर्व सण उत्साहाने साजरे करतात.
ख्रिसमस हा एक मोठा सण आणि जो थंडीच्या ऋतूमध्ये साजरा केला जातो.
ख्रिसमस हा सण संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आफ्रिका, युरोप, अमेरिका या देशातही नाताळ सण साजरा केला जातो.
ख्रिसमसला मराठी भाषेत नाताळ असे म्हंटले जाते. सर्वजण ख्रिसमस सणाची आतुरतेने वाट पाहतात. हा सण दरवर्षी हिवाळ्याच्या मोसमात येतो. लोक तो आनंदाने साजरा करतात.
२५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता. येशू ख्रिस्त यांनी सर्वांना प्रेम आणि मानवतेची शिकवण दिली.
नाताळ हा सण २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो.
ख्रिश्चन श्रद्धेनुसार ख्रिसमस हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. “natal nibandh in marathi“
नाताळ या सणाला आपल्या भारत देशात बिग डे असेही संबोधले जाते. नाताळ हा सण सोबत आनंद घेऊन येतो.
ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मनाला जातो. या दिवशी लोक ख्रिसमस ट्री सजवतात तसेच Gत्यांचे मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत साजरे करतात आणि भेटवस्तू वितरीत करतात.
मुले आतुरतेने सांता आणि या दिवसाची वाट पाहत असतात. इतर सणांप्रमाणे ख्रिसमस हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो.
नाताळ हा एक प्रमुख ख्रिस्ती सण आहे. या दिवशी लोक एकमेकांना वेगवेगळ्या भेटवस्तू, शुभेच्छा देतात. या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देणे फार महत्वाचे समजले जाते.
ख्रिसमस निबंध मराठी | christmas nibandh in marathi
ख्रिसमस सणाच्या काही दिवस आधीच लोकांमध्ये सणाची आतुरता पाहायला मिळते. लोक आपल्या घराची व घराच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करतात.
लोक नवनवीन कपडे खरेदी करतात. घरांना तोरणे लावली जातात. घरे प्रकाशमय होतात. ख्रिसमसच्या सणात लोक या दिवशी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना सुंदर शुभेच्छापत्रे पाठवतात(natal nibandh in marathi)
महिन्याच्या सुरुवातीलाच लोक पूर्ण उत्साहाने या सणाची तयारी सुरू करतात.. घरांना छोट्या दिव्यांच्या माळा लावतात. घरोघरी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात.
या दिवशी ख्रिसमस ट्री उभारली जाते. ही ट्री सूचिपर्णी वृक्षापासून बनवली जाते.
ख्रिसमस ट्री उभारून त्यास सजवले जाते. ख्रिसमस ट्री सजवल्यामुळे अतिशय सुंदर दिसते.
नाताळ सणाला चर्च मध्ये जाऊन प्रार्थना केली जाते. इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी चर्च मध्ये जास्त गर्दी पाहायला मिळते. या दिवशी एकमेकांना ख्रिसमस कार्ड दिले जातात.
क्रिसमस निबंध मराठी | christmas nibandh in marathi
नाताळ या सणादिवशी शाळा, कॉलेज, कार्यालये यांना सार्वजनिक सुट्टी असते.
लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेशात वेगवेगळ्या भेटवस्तू व खाऊ देतात. सांताक्लॉज हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य असते.(christmas nibandh in marathi)
लहान मुलांना या सणाची खूप ओढ असते. लहान मुले या सणाची आतुरतेने वाट पाहतात. सर्व लोक सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा करतात.
ख्रिश्चन बांधव एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा देतात. नाताळ सण सगळीकडे आनंदी व उत्साही वातावरणात साजरा केला जातो. अशाप्रकारे नाताळचा सण सर्वांना एकोप्याने जगण्याचा संदेश देतो.
तर मित्रांनो तुम्हाला नाताळ निबंध मराठी हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ natal nibandh in marathi निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
आजच्या नाताळ निबंध मराठी… या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद