NEET Exam Information In Marathi:- तुम्हाला माहीत आहे का, NEET exam काय आहे? जर तुम्ही फक्त NEET च नाव ऐकल असेल, आणि तुम्हाला NEET चा अर्थ माहीत नसेल, तर आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत What is NEET in Marathi?
जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपल्या मनात खुप प्रश्न येतात की आपल्याला पुढे जाऊन काय करायचे आहे. ज्या मुलांना Engineering करायची असते, ते B.Tech करतात . ज्या मुलांना Air Hostess बनायचे असते ते एयर लाइन चा कोर्स करतात. पण जर तुम्हाला डाॅक्टर बनायचे असेल तर तुम्हाला NEET बद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. कारण NEET exam हि डाॅक्टर बनण्यासाठी एक महत्वाची परीक्षा आहे.
आजच्या काळात Medical Field मध्ये खुप कोर्स आहेत. NEET Exam खुप Popular Exam आहे . जर तुम्ही नीट परीक्षा चांगल्या मार्क्सने पास केलीत तर तुम्हाला यानंतर डाॅक्टर बनण्यासाठी सरकारी काॅलेज साजह मिळतो. यामध्ये तुम्ही एमबीबीएस व बीडीएस चा अभ्यास करु शकता. काही विद्यार्थी असे असतात की जे पहिल्याच वेळेला NEET Exam मध्ये पास होतात आणि काही विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी काही वेळ लागतो. कारण नीट च्या परीक्षेचा पॅटर्न खुप कठीण असतो. यासाठी तुम्हाला खुप मेहनती सोबत योग्य दिशेने अभ्यास करण्याची आवश्यकता असते. या नंतरच तुम्ही नीटच्या परीक्षेमध्ये पास होऊ शकता. विद्यार्थीमित्रांनो पूर्ण मेहनत आणि जिद्दीने अभ्यास करुनच तुम्ही नीटच्या परीक्षे मध्ये पास होऊ शकता.
नीट काय आहे | NEET Exam Information In Marathi
NEET ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे, जी NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) मार्फत घेतली जाते. विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, हा या परीक्षेचा महत्वाचा उद्देश आहे. जर तुम्हाला एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी), बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल) इत्यादींमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
भारतातील कॉलेजमध्ये ऍडमिशन फक्त एमबीबीएस आणि एमडीएस मध्ये प्रवेश नीट परीक्षेच्या आधारेच केला जातो. पूर्वी NEET exam हि AIPMT exam(All India Pre Medical Test) या नावाने ओळखली जात असे. पण सध्या त्याचे नाव AIPMT वरून NEET असे करण्यात आले. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही नीटची परीक्षा देऊ शकता .
जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे असेल तर तुम्ही नीट परीक्षा देऊ शकता आणि यानंतर तुम्हाला एमबीबीएस , बीडीएस , एमएस हे कोर्स करण्यासाठी चांगल्या काॅलेज मध्ये प्रवेश मिळेल. जे विद्यार्थी मेडिकल च्या अभ्यासासाठी योग्य असतील अशा विद्यार्थ्यांची निवड करणे हा नीट परीक्षेचा मुख्य उद्देश आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मोठ्या प्रमाणात होणारी हेराफेरी टाळण्यासाठी नीट परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
NEET चा फुल फाॅर्म काय आहे? । What is the full form of NEET in Marathi
NEET चा फुल फाॅर्म National Eligibility Cum Entrance Test आहे . नीट चा मराठी मध्ये फुल फाॅर्म आहे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा.
नीट म्हणजे काय? | NEET Meaning in Marathi
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) ही एक प्रकारची राष्ट्रीय स्तरीय परीक्षा आहे. ही परीक्षा भारतीय मेडिकल आणि डेंटल काॅलेजांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) द्वारा आयोजित केली जाते.
NEET चा कोर्स किती वर्षांचा असतो?
जे विद्यार्थी आता 10th आणि 12th मध्ये आहेत अशा खुप विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की NEET चा कोर्स किती वर्षांचा असतो तर मित्रांनो नीट चा कोणताही कोर्स नसतो, नीट ही एक परीक्षा आहे. तुम्ही ही परीक्षा पास केल्यानंतर मेडीकल क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकता. तर मला आशा आहे की, तुम्हाला हे समजले असेल की नीट चा कोणताही कोर्स नसतो तर नीट ही राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी परीक्षा आहे.
नीट परीक्षा किती वेळा होते?
नीट ची परीक्षा ही एका वर्षामध्ये एकाच वेळेला आयोजित केली जाते. जेव्हा तुम्ही या परीक्षेमध्ये पास व्हाल तेव्हा तुम्हाला सरकारी किंवा प्राइवेट मेडिकल काॅलेज मध्ये प्रवेश मिळतो. जे विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये पास होत नाहीत ते पुन्हा फाॅर्म भरून नीट ची परीक्षा देऊ शकतात.
NEET परीक्षे साठी Qualifications
NEET Exam साठी किती Qualification असायला पाहिजे, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि की नीट परीक्षा देण्यासाठी तुम्हाला 10th आणि 12th मध्ये कमीत कमी 50% मार्कांनी पास होणे अनिवार्य आहे. यानंतरच तुम्ही ही परिक्षा देऊ शकता. तुम्हाला नीट परिक्षा देण्यासाठी 12th मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री , बायोलाॅजी व इंग्रजी हे विषय असणे अनिवार्य आहे .
NEET साठी Age Limit किती आहे?
नीट साठी जास्तीत जास्त वयमर्यादा कोणतीही नाही. तुम्ही 12th मध्ये पास झाल्यानंतर नीट ची परीक्षा देऊ शकता.
NEET Exam ची फी किती असते?
सामान्य श्रेणीसाठी – 1500 रुपये
सामान्य ईडब्ल्यूएस / ओबीसीसाठी – 1400 रुपये
एसटी / एससी / पीडब्ल्यूडी – 800 रुपये .
नीट परीक्षेचे फायदे । Benefits of NEET Exam in Marathi
NEET परीक्षा काय असते हे तुम्हाला समजलेच असेल तर आता आपण बघूया नीट परीक्षेचे फायदे काय असतात –
1 ) नीट परीक्षेचा फायदा असा आहे की, जर तुम्हाला मेडिकल कोर्स करायचा असेल तर तुम्हाला नीट परीक्षेमध्ये पास होणे गरजेचे आहे .
2 ) पुर्वी मेडिकल काॅलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी खुप प्रकारच्या परिक्षांमध्ये पास होणे गरजेचे असायचे आता तुम्हाला मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी फक्त नीट परीक्षा देण्याची गरज असते .
3 ) पूर्वी विद्यार्थी खुप प्रकारच्या परिक्षांची तयारी करायचे आता फक्त नीट परीक्षे मध्ये पास होऊन विद्यार्थी मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ शकतात .
NEET Exam Information In Marathi। नीट (Neet) काय आहे? ।NEET meaning in marathi
NEET Exam Pattern 2023 in Marathi
विषय (सेक्शन) | प्रश्नांची संख्या | मार्क्स |
---|---|---|
भौतिकशास्त्र (Physics) | 45 | 180 |
रसायनशास्त्र (Chemistry) | 45 | 180 |
प्राणीशास्त्र (Zoology) | 45 | 180 |
जीवशास्त्र (Biology) | 45 | 180 |
एकूण (Total) | 180 | 720 |
NEET परिक्षेची तयारी कशी करायची?
ज्या विद्यार्थ्यांना नीट ची परीक्षा द्यायची असेल आणि जे 12th मध्ये असतील त्यांना प्रश्न असतो की, 12th नंतर नीट परिक्षेची तयारी कशी करायची. जर तुम्ही अभ्यासामध्ये चांगले असाल आणि तुम्हाला सगळे प्रश्न समजत असतील तर तुम्ही घरी देखील नीट च्या परीक्षेची तयारी करू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नीट च्या परीक्षेसाठी क्लास लावू शकता.
1 ) नीट च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपला बेस मजबूत करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला 11th आणि 12th मध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल. जर तुम्ही सुरुवाती पासूनच चांगल्या प्रकारे अभ्यास केलात तर तुमची जास्तीत जास्त तयारी 12th मध्येच होऊन जाईल. कारण नीट परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे NCERT मधून घेतले जातात .
2 ) जेव्हा तुम्ही 12th मध्ये पास होता, त्यानंतर तुम्ही अन्य पुस्तकांचीही मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला सगळे टाॅपिक चांगल्या रितीने समजतील .
3 ) तुम्हाला नीट परीक्षा पास करण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलाॅजी या विषयांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे .
4 ) नीट च्या परीक्षेसाठी तुम्हाला बायोलाॅजी विषयाची चांगली माहिती असणे गरजेचे आहे. कारण जीवविज्ञानाचे प्रश्न फिजिक्स केमिस्ट्री च्या तुलनेने थोडे सोपे असतात .
5 ) परीक्षेच्या आधी माॅक टेस्ट जरूर द्या. यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफार्म चा देखील वापर करू शकता.
6 ) नीट च्या परीक्षेच्या दरम्यान तुमच्या खाण्या पिण्यावर विशेष लक्ष द्या.
हे पण वाचा
भारतात आयपीएस अधिकारी कसे बनता येईल
NEET चा Syllabus 2024। NEET Syllabus in Marathi
नीट भारतातील एक अत्यंत उपयोगी परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने परखले जाते. जर तुम्ही नीट च्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही स्वता:ला सुरुवाती पासूनच तयारी ठेवायला पाहिजे. नीट चे दोन सिलेबस असतात , Neet UG & PG syllabus 2022.
NEET EXAM FAQ in Marathi
बीएससी नर्सिंग साठी नीट गरजेची आहे का ?
बीएससी नीट साठी नीट जरुरी नाही आहे. काही काॅलेज नीट च्या आधारावर ऍडमिशन देतात. काही काॅलेज असे आहेत जे नीट परीक्षे शिवाय देखील तुम्हाला ऍडमिशन देतात .
कोचिंग शिवाय नीट ची तयारी कशी करायची ?
जर तुम्हाला घरातुनच नीटची तयारी करायची असेल तर तुम्हाला यासाठी सगळ्यात आधी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील. यामुळे तुम्हाला नीट परीक्षेच्या पॅटर्न बद्दल चांगल्या प्रकारे समजेल. याशिवाय तुम्ही NCERT आणि अन्य पुस्तकांची देखील मदत घेऊ शकता .
नीट मध्ये किती मार्क्स असतील तर सरकारी काॅलेज मिळेल ?
जर तुम्हाला नीट परीक्षेच्या नंतर सरकारी काॅलेज मध्ये एडमिशन घ्यायच असेल तर अनरक्षित किंवा सामान्य श्रेणी साठी तुम्हाला कमीत कमी 520 ते 610 मार्क्स मिळवण्याची आवश्यकता आहे .
नीट मध्ये किती विषय असतात
नीट परिक्षेमध्ये येणारे प्रश्न फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलाॅजी मध्ये बाॅटनी आणि जूलाॅजी या विषयांमधून विचारले जातात .
नीट चा पेपर हिंदी मध्ये असतो का?
पूर्वी नीट ची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी मध्ये असायची. पण आता ही परीक्षा नऊ भाषांमध्ये होते. तुम्ही फाॅर्म भरताना जी भाषा निवडता त्या भाषेचा पेपर तुम्हाला मिळतो .
मी नीटशिवाय एमबीबीएस करू शकतो?
एमबीबीएस कोर्ससाठी NEET परीक्षा न देता भारतात प्रवेश मिळवणे शक्य नाही. भारतात किंवा परदेशात एमबीबीएसच्या प्रवेशासाठी NEET UG परीक्षा देणे अनिवार्य आहे. तथापि, इतर अनेक वैद्यकीय अभ्यासक्रम आहेत ज्यात आपण 12 वी श्रेणीच्या गुणांच्या आधारावर सहभागी होऊ शकता.
Conclusion
मित्रांनो NEET Exam Information In Marathi या लेखामध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
NEET Exam Information In Marathi या लेखाबद्दल तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.